घरकुलांसाठी केंद्र शासनाचे अनुदान मिळाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:52+5:302021-08-20T04:47:52+5:30
वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (नागरी) राज्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थींना केंद्र शासनाच्या हिश्श्याचे अनुदान मिळाले नव्हते. १८ ...
वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (नागरी) राज्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थींना केंद्र शासनाच्या हिश्श्याचे अनुदान मिळाले नव्हते. १८ ऑगस्ट रोजी केंद्र शासनाचे अनुदान मिळाल्याने लाभार्थींना लवकरच अनुदान मिळणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (नागरी) शहरी भागातील पात्र लाभार्थींना घरकुलासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळतो. गतवर्षी घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी मिळाला नसल्याने अनुदान रखडले होते. बांधकाम झाल्यानंतरही अनुदान मिळत नसल्याने वाशिमसह राज्यात अन्य ठिकाणीदेखील लाभार्थींनी विविध टप्प्यात आंदोलन केले. वाशिम येथे नगर परिषद कार्यालयासमोरही लाभार्थींनी आंदोलन केले होते. आता केंद्र शासनाच्या हिश्श्याचा ७९ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच प्रलंबित अनुदान मिळण्याच्या लाभार्थींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.