निकालदर्शक अभिलेख मुल्यांकनात वाशिमचे ‘सीईओ’ प्रथम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:27 PM2018-05-19T16:27:15+5:302018-05-19T16:27:15+5:30
वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी १९ मे रोजी दिली.
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मार्च २०१८ च्या निकालदर्शक अभिलेखाव्दारे (आरएफडी) विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्याकडून मुल्यांकन करण्यात आले. त्यात वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी १९ मे रोजी दिली.
प्राप्त माहितीनुसार, विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुल्यमापनाकरिता गुगल ड्राईव्हवर स्प्रेडशीट तयार करून प्रत्येक जिल्ह्याची योजनानिहाय जिल्हा व तालुकास्तरावरील योजनांचे उद्दीष्ट, साध्य आदींबाबत अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १०० गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे पाच क्रमांक जाहीर करण्यात आले. त्यात वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १०० पैकी ७१.१३ टक्के गुण मिळून ते प्रथम आले; तर बुलडाणा व्दितीय, अमरावती तृतीय, यवतमाळ चतुर्थ आणि अकोला मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाचवा क्रमांक जाहीर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.