निकालदर्शक अभिलेख मुल्यांकनात वाशिमचे ‘सीईओ’ प्रथम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:20 PM2018-08-28T14:20:25+5:302018-08-28T14:20:59+5:30
वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक असून, पाचव्या क्रमांकावर अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या चालू आर्थिक वर्षातील जुलै २०१८ पर्यंतचे प्रशासकीय कामकाज तसेच योजनांच्या उद्दिष्टपूर्तीचे मुल्यांकन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्याकडून करण्यात आले. यासाठी जुलै २०१८ च्या निकालदर्शक अभिलेखाचा (आरएफडी) आधार घेतला असून, यामध्ये वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक असून, पाचव्या क्रमांकावर अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुल्यमापनाकरीता गुगल ड्राईव्हवर स्प्रेडशीट तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील विविध योजनांचे एकूण उद्दिष्ट व आतापर्यंतचे साध्य याविषयी अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील जुलैपर्यंत जिल्हा व तालुका स्तरावर आॅनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे विभागीय आयुक्तांनी २३ आॅगस्ट रोजी गुणानुक्रम जाहीर केले असून, २४ आॅगस्टला मुख्य कार्यकारी अधिकाºयांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा गुणानुक्रम प्रथम असून, त्यांना १०० पैकी ४७.४२ अशी टक्केवारी देण्यात आली. त्याखालोखाल बुलडाणा मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा दुसरा क्रमांक असून, त्यांची टक्केवारी ४४.९९, अमरावती मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा तिसरा क्रमांक असून त्यांची टक्केवारी ४३.४०, यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा चवथा क्रमांक असून, त्यांची टक्केवारी ३८.१७ तर सर्वात शेवटचा क्रमांक अकोला मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा असून, त्यांची टक्केवारी ३४.१८ अशी आहे.