पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:55 PM2018-12-11T14:55:43+5:302018-12-11T14:55:55+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. १० डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, भुजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. कडु, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे विवेक राजुरकर आणि अभिजित दुधाटे यांची उपस्थिती होती.
मीना यांनी गावातील साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध यंत्रणांची बैठक घेत योग्य त्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअर ईत्यादी सार्वजनिक स्त्रोतांची जैविक व रासायनिक पाणी नमुणे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ग्राम पंचायतचे ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी तसेच तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बौठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या कामात विलंब झाल्यास व लोकांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा ईशारा मीना यांनी दिला.