पीककर्जमाफीसाठी शिवसंग्रामचे ‘चक्का जाम’ आंदोलन

By admin | Published: June 8, 2017 03:38 PM2017-06-08T15:38:24+5:302017-06-08T15:38:24+5:30

८ जून रोजी वाशिम जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले.

'Chakka Jam' movement of Shiv Sangram for movement of crops | पीककर्जमाफीसाठी शिवसंग्रामचे ‘चक्का जाम’ आंदोलन

पीककर्जमाफीसाठी शिवसंग्रामचे ‘चक्का जाम’ आंदोलन

Next

वाशिम : शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ८ जून रोजी वाशिम जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले.
सध्या शेतकरी विविध संकटातून जात असतानाही, शासन संवेदनशील नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव नाही, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नाही यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला नाही. शेतकऱ्यांना  अच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचा स्वप्नभंग केला आहे, असा आरोप करीत शिवसंग्रामने वाशिम जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला समाधानकारक हमीभाव मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतीला अखंड व अत्यल्प दरात वीजपुरवठा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी चक्का जाम आंदोलन केले. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: 'Chakka Jam' movement of Shiv Sangram for movement of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.