स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:37 PM2017-10-08T13:37:41+5:302017-10-08T13:38:12+5:30

Change the mindset of women | स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलावी 

स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलावी 

Next
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील शरद व्याख्यानमाला

कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले . कारंजा येथे सुरु असलेल्या नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. स्त्रियांचे बदलते विश्व संरक्षण मागण्यापासून तर ते देण्यापर्यत हा त्यांच्या व्याख्यानामाचा विषय होता. प्रारंभी राधा मुरकुटे यांनी त्यांचे स्वागत केले तर डॉ.अनघा कांत यांनी परिचय करुन दिला.

स्त्रियांच्या शोषणविषयी बोलताना पाटील पुढे म्हणाल्या  की , स्त्रियांचे कर्तृत्व व क्षमता असून सुद्धा कौटूंबिक परिधान तिचं स्थान दुय्यम ठरते. घरातील मुलामुलींच सासु सासºयांच सांभाळ करणे, मुलांच्या डब्यापासून तर घरातील प्रत्येक वस्तुंची देखभाल तिलाच करावी लागते . पुरुष मात्र घरातील कोणतीच काम न करता चहा पितो, पेपर वाचतो, एखादा वेळ संजीव कपूर सारखी स्वंयपाकाची जबाबदारी पेलली तर कुठे बिघडते. मात्र पुरुषांनी घरातील कामे करणे ह ेतिलाही मान्य नसत ,ेहे स्त्रियांचे काम आहे अशी तिची धारणा असते त्यामुळे त्या पुुरुषांप्रमाणे मनसोक्त आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेवू शकत नाही त्या कायमच्या शोषीत बनतात.

मुलामुलींमध्ये भेदभाव विषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलाचं वर्णन कसही असलं म्हणजे तो फाजील असला उद्धट असला, बेशिस्त असला तरीही पालकांची काही तक्रार नसते. कारण तो कुळाचा दिवा असतो. आपल्याला अग्नी देणारा असतो म्हणून त्याचे फाजील लाड पुरवून घेतले जातात . मात्र मुलीने शांत रहावे, उद्धटपणाने वागू नये चालताना इकडे तिकडे पाहू नये खाली पाहूनच चालावे अशा प्रकारे सक्तीपुर्ण अपेक्षा समाज करीत असतो. मुलींच्या संरक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे शिकावे परंतु ही बाब मला पटत नाही कारण संरक्षणासाठी तिला कराटे शिकण्याची वेळ का यावी या मुलभुत प्रश्नाविषयी कोणी विचार करीत नाही. याउलट मुलींना त्रास देणाºया प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे .त्यांच्या संस्कारावर जाणीवपुर्वक लक्ष द्यावे तर ते फाजील बनणार नाहीत , रोड रोमीओ बनणार नाही आणि पोलिसांची ही कामे कमी होतील . स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. देशाचंद सरक्षणपद आज तिच्या हातात आहे. आयपीएससारख्या परिक्षेत ती पहिल्या रॅकमध्ये उत्तीर्ण होत आहे. १० वी १२ वीच्या परिक्षेत त्या दरवर्षी मुलांपेक्षा आघाडीवर असतात. तिचं विश्व बदलले आहे ती आता सरक्षणमागण्याऐवजी संरक्षण देण्यास कटीबद्ध झालेली आहे असे पाटील म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.कवित मिसाळ यांनी केले तर आभार प्रा.आश्विनी ठाकुर यांनी मानले. डॉ.सुशिल देशपांडे यांनी शारदा सावत म्हटले. 

Web Title: Change the mindset of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.