बदलत्या वातावरणाचा फटका : वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:50 PM2017-12-10T23:50:49+5:302017-12-10T23:53:05+5:30

वाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली.

Changing Environmental Impact: Due to the incidence of dead disease on tamarind crops in Washim district | बदलत्या वातावरणाचा फटका : वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

बदलत्या वातावरणाचा फटका : वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देकृषी विभागाने आरंभली पाहणी मोहितजमिनीतील बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव : शास्त्रज्ञांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते यांनी केला.
यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकºयांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कपाशीवरील बोंडअळींच्या आक्रमणाने अगोदरच गारद झालेला शेतकरी आता तूर पिकावरील मूर रोगाने पुरता कोलमडून जात आहे. यावर्षी खरिप हंगामात वाशिम जिल्ह्यात एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरपैकी पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी ७० हजार हेक्टरच्या आसपास तूरीची लागवड होती. आतापर्यंत बºयापैकी असलेल्या तूरीला शेवटच्या टप्प्यात वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम जाणवत आहे. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे तूरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून समोर आले. वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई परिसर, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, खेर्डी, रेगाव, कळंबेश्वर, पांगरी बु., मंगरूळपीर तालुक्यात हिसई, रहित, पार्डीताड, रिसोड तालुक्यात पळसखेडा, वाकद, व्याड आदी परिसरातील तूरीवर मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. दरम्यान, कृषी विभागाने केलेल्या पाहणीतही मर रोगाचे प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने मर रोगावर नियंत्रण मिळवावे, काही अडचण, शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख यांनी केले.
 

Web Title: Changing Environmental Impact: Due to the incidence of dead disease on tamarind crops in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.