Video - नेत्रहीन विजय टाळ्या वाजवून गातो राष्ट्रगीताची धून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:27 PM2019-02-01T14:27:22+5:302019-02-01T15:33:09+5:30
वाशिम : तो जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. मात्र, प्रारब्धाला त्याने कधी दोष नाही दिला; तर अंधत्वावर मात करित त्याने आपल्या अंगी आगळीवेगळी कला बाळगून त्याची जोपासना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तो जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. मात्र, प्रारब्धाला त्याने कधी दोष नाही दिला; तर अंधत्वावर मात करित त्याने आपल्या अंगी आगळीवेगळी कला बाळगून त्याची जोपासना केली. तो ‘जन-गन-मन’ या राष्ट्रगिताची धून टाळ्या वाजवून आणि तोंडातून आवाज काढून वेगळ्याच शैलीत गातो. क्रीकेटची कॉमेंट्रीही इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून त्याला चांगलीच अंगवळणी पडली असून त्याच्या या कला पाहून डोळसांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
विजय राजाराम खडसे (अमानी, ता. मालेगाव) असे नाव असलेला तथा दोन्ही डोळ्यांनी अंध चिमुकला सद्या नेत्रहिन चेतन उचितकर ग्रुपचा एक सदस्य आहे. त्याने आपल्या अंगी आगळीवेगळी कला बाळगून तीची जोपासना केली. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून आणि त्याचवेळी तोंडातून एका वेगळ्याच प्रकारचा आवाज काढून तो संपूर्ण राष्ट्रगित म्हणून दाखवितो. विशेष म्हणजे ही कला त्याने कुठूनही कॉपी केली नसून स्वत:च आत्मसात केली आहे. क्रीकेटची कॉमेंट्री देखील विजयचा आवडता छंद असून इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून तो भल्याभल्यांना लाजवेल अशी, कॉमेंट्री करतो. विजय खडसेच्या या अलौकीक कला पाहून, अनुभवून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.