मालेगाव नगर पंचायतचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:10 PM2018-12-28T15:10:28+5:302018-12-28T15:10:52+5:30

मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे.

Charge of Malegaon Nagar Panchayat to Risod cheif officer | मालेगाव नगर पंचायतचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे

मालेगाव नगर पंचायतचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी सोनू बळी यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.  येत्या ५ दिवसांत दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे
पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मागील अनेक महिन्यांपासून मालेगावला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रहिवासी दाखल्याची जन्ममृत्यूच्या नोंदी, घराचे जागेचा ८ अ , प्रॉपर्टी कार्ड आदी कामासाठी १५ ते २० दिवस लागत आहेत. या अगोदरचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची रिसोड येथे बदली झाली. तेव्हापासून ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून मालेगावचे कामकाज सांभाळत आहेत. त्यामुळे मालेगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास रखडला असून सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ कामासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेषत: शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल,रमाई घरकुल योजना आदी कामे रखडली आहेत.आजमितीला शहरात सुरु असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांवर कुणाचाही वचक उरला नसल्याचे नमूद आहे. मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचााºयांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. ही बाब लक्षात घेऊन येत्या ५ दिवसांत नविन मुख्य धिकारी न दिल्यास उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशाराही निवेदनाद्वारे बळी यांनी दिला आहे.

Web Title: Charge of Malegaon Nagar Panchayat to Risod cheif officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.