वाशिम जिल्ह्यात ६३१ गावांमध्ये ‘चावडी वाचन’ पूर्ण!

By admin | Published: June 11, 2017 01:56 PM2017-06-11T13:56:36+5:302017-06-11T13:56:36+5:30

९ जूनअखेर त्यातील ६३१ गावांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.

'Chawdi reading' is complete in 631 villages in Washim district! | वाशिम जिल्ह्यात ६३१ गावांमध्ये ‘चावडी वाचन’ पूर्ण!

वाशिम जिल्ह्यात ६३१ गावांमध्ये ‘चावडी वाचन’ पूर्ण!

Next

वाशिम : राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी ह्यडिजिटल इंडियाह्ण या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८०९ गावांमध्ये तीन टप्प्यात विशेष चावडी वाचन मोहिम राबविण्यात येत असून ९ जूनअखेर त्यातील ६३१ गावांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. शेतकऱ्यांना अद्ययावत तथा बिनचूक सात-बारा देणे, हा या उपक्रमामागील मूळ हेतू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. 
राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सन २००८ पासून सात-बारा अद्ययावतीकरणासह शेतकऱ्यांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या दस्तावेजातील त्रुट्या दुर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ह्यडिजिटल इंडियाह्ण या अभिनव उपक्रमांतर्गत अद्ययावतीकरण पूर्ण झालेले सात-बारा दस्तावेज केवळ एका क्लिकवर ह्यआॅनलाईनह्ण उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तत्पूर्वी शेवटचा हात म्हणून जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्ह्यातील महसूली विभागातील ८०९ गावांमध्ये चावडी वाचन मोहीम राबविणे सुरू केले असून यामाध्यमातून त्या-त्या गावातील तलाठ्यांकडून सात-बारा वाचन करून संबंधित शेतकऱ्यांच्या नावात, जमिनीच्या क्षेत्रफळात किंवा इतर काही त्रुट्या असल्यास त्या तत्काळ दुर केल्या जात आहेत. ८०९ पैकी ६३१ गावांमध्ये ही मोहिम पूर्ण झाली असून येत्या १५ जूनपर्यंत उर्वरित गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी सांगितले. 

Web Title: 'Chawdi reading' is complete in 631 villages in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.