समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:19 PM2018-04-14T14:19:42+5:302018-04-14T14:19:42+5:30

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

Cheating of farmers in Malegaon taluka in the land acquisition | समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

Next
ठळक मुद्देनागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत.या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दिशाभूल होत असल्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकेत नसल्याचे दिसत आहे. 

राज्यातील बहुप्रतिक्षीत नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे. तथापि, या भूसंपादन प्रक्रि येत ठरलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे; परंतु प्रशासकीय अधिकारी या उद्देशाला तडा देत आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती बागायती अर्थात सिंचन क्षेत्राखालील असतानाही ती कोरडवाहू दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या शेतकºयांना गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली. त्याच शेतकऱ्यांची नोंद कोरडवाहू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अनेक शेतकºयांकडे पक्क्या पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची पूर्ण सुविधा आहे. त्यांनाही कोरडवाहू दाखविले आहे. त्याशिवाय फळबागधारक शेतकऱ्यांचीही कोरडवाहू म्हणून अधिकाºयांकडून नोंद केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकतेत राहिले नसून, त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केले आहे. तथापि, अधिकारी वर्ग मात्र शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करीत असल्याचा आरोपही शेतकºयांनी निवेदनातून केला आहे. सुभाष गणेशलाल मानधने, शोभा डिगांबर दहात्रे, विजय दहात्रे, मनोज दहात्रे, कृष्णा दहात्रे, गजानन श्रीकिसन दहात्रे, कैलाश दहात्रे, दलाल धन दहात्रे, राजू दहात्रे, सुर्यप्रकाश दहात्रे, रमेश दहात्रे, स्वाती दहात्रे, ज्योती दहात्रे आदि शेतकºयांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले असून, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

समृद्धी मार्गासाठी शेतकºयांकडून जमिनी घेताना त्याचा योग्य मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, या मार्गासाठी अधिकारी वर्ग दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार, पालकमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.  

Web Title: Cheating of farmers in Malegaon taluka in the land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.