विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी !

By Admin | Published: May 12, 2017 05:13 PM2017-05-12T17:13:23+5:302017-05-12T17:13:23+5:30

वाहतूक सुरक्षितता म्हणून विद्यार्थी वाहतूक करणाºया सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

Checking of vehicles transporting students! | विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी !

विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी !

googlenewsNext

वाशिम : वाहतूक सुरक्षितता म्हणून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीसाठी सर्व वाहनधारकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहन आणण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी शुक्रवारी केल्या.
वाशिम जिल्ह्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची एकूण संख्या ९१ आहे. सुरक्षित प्रवासासाठी वाहन सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वाहनाची कालमर्यादा, वाहनांची स्थिती यासह अन्य तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने निश्चित कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व ९१ वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संबंधित वाहनधारकांना विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन व विधीग्राह्य कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. स्कूल बस नियमावलीनुसार वाहन व कागदपत्रांची तपासणी होणार असून, तपासणी न करणाऱ्या ह्यस्कूल बसह्णधारकांविरूद्ध मोटारवाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांनी दिला.

Web Title: Checking of vehicles transporting students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.