मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कारंजात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 03:22 PM2019-08-06T15:22:35+5:302019-08-06T15:23:08+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारंजा नगरीत दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारंजा नगरीत दाखल झाली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. यादरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून १६३९ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. दरम्यान ६ आॅगस्ट रोजी दारव्हा मार्गे ही यात्रा गुरूनगरी कारंजात दुपारी दाखल झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आहे.