मुख्यमंत्री आज पोहरादेवीत
By Admin | Published: April 2, 2017 02:30 AM2017-04-02T02:30:22+5:302017-04-02T02:30:22+5:30
जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा काशीत अर्थात पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत.
मानोरा (वाशिम), दि. १- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा काशीत अर्थात पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत.
पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त भव्य यात्रा भरत असते. संपूर्ण देशातील भाविक पोहरादेवीत दाखल होतात. संत सेवालाल महाराज, देवी जगदंबा, शामकीमाता, ज्योतीबाबा, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांचे मोठय़ा आस्थेने दर्शन घेऊन भाविक आपला नवस फेडतात.
२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवी येथे येणार आहेत. शिवणी विमानतळ अकोला येथून सकाळी १0.२0 वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी १0.४५ वाजता पोहरादेवी हेलिपॅड येथे आगमन व सकाळी १0.५५ वाजता शासकीय वाहनाने सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाकडे प्रयाण होणार आहे. दरम्यान, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हेदेखील अकोला येथून मुख्यमंत्र्यांसमवेत राहणार आहेत. तसेच राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे २ एप्रिल रोजी पोहरादेवी दौर्यावर येत आहेत. २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथून मोटारीने तीर्थक्षेत्र पोहरादेवीकडे ते प्रयाण करतील. सकाळी १0 वाजता पोहरादेवी येथे आगमन आणि संत सेवालाल महाराज समाधी दर्शनास उपस्थिती राहणार आहे.