बसस्थानकावर चिकार गर्दी, कोरोना संसर्गाबाबत जनता बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:30+5:302021-04-01T04:42:30+5:30
------------------ चालक, वाहकही मास्कवापराबाबत उदासीन एकीकडे जनता बसस्थानकावर गर्दी करून कोरोना संसर्गाला आमंत्रण देत आहे, तर दुसरीकडे चालक, वाहकही ...
------------------
चालक, वाहकही मास्कवापराबाबत उदासीन
एकीकडे जनता बसस्थानकावर गर्दी करून कोरोना संसर्गाला आमंत्रण देत आहे, तर दुसरीकडे चालक, वाहकही स्वत:सह प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत नसून, बहुतांश चालक, वाहक बसमध्ये प्रवाशांना मास्क वापरण्याची सूचना करणे, तर दूरच उलट स्वत:ही मास्कचा वापर करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते.
------------------
दरदिवशी हजारोंचा एकमेकांशी संपर्क
जिल्ह्यात सहा बसस्थानके आहेत. या चारही बसस्थानकांतून दरदिवशी शेकडो बसगाड्या परजिल्ह्यात जातात आणि येतातही. या बसगाड्यांद्वारे हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात परजिल्ह्यातून येणारे वाशिम जिल्ह्यात मुक्कामी असतात, तर वाशिम जिल्ह्यातील हजारो प्रवासी परजिल्ह्यात मुक्कामी जातात. या प्रवासातून हजारोंचा एकमेकांशी दरदिवशी संपर्क होतो. त्यात ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होते ना मास्क लावला जातो आणि सॅनिटायझरचा वापरही केला जात नाही.
--------------------------
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १५८६७
ॲक्टिव्ह – २६२१
डिस्चार्ज – १३०५८
मृत्यू – १८७