बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली कुपोषित बालके दत्तक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:51+5:302021-03-08T04:38:51+5:30

वाशिम : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम येथील बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी काटा येथील सात ...

Child Development Project Officers Adopt Malnourished Children! | बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली कुपोषित बालके दत्तक !

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली कुपोषित बालके दत्तक !

Next

वाशिम : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम येथील बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी काटा येथील सात कुपोषित बालके दत्तक घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला. यापूर्वीदेखील त्यांनी अनसिंग येथील सहा बालके दत्तक घेतली होती.

कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची व आयोडिनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी प्रियंका गवळी यांनी पुढाकार घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी अनसिंग येथील सहा कुपोषित बालके दत्तक घेतली होती. या बालकांना स्वखचार्तून पोषक आहार पुरविण्याबरोबरच त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीकडे लक्ष दिले. यापैकी पाच बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात यश आले. आता काटा येथील सात कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी गवळी यांनी या बालकांना दत्तक घेतले आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते पौष्टिक घटक असलेले अन्नपदार्थ त्यांना स्वखचार्तून पुरविले जाणार असून, ही बालके कुपोषणमुक्त होईपर्यंत दत्तक घेतली जाणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. गवळी या जिल्हा महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षही आहेत. प्रशासकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२०, नारीशक्ती पुरस्कार-२०२०, रणरागिणी महाराष्ट्राची, राष्ट्रीय आदर्श नारीरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार, वुमेन्स एक्सलन्स अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्ड -२०२० आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Child Development Project Officers Adopt Malnourished Children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.