बालकामगारप्रकरणी चौकशीचे आदेश

By admin | Published: December 13, 2014 12:27 AM2014-12-13T00:27:13+5:302014-12-13T00:27:13+5:30

लोकमत वृत्ताची दखल.

Child labor inquiry order | बालकामगारप्रकरणी चौकशीचे आदेश

बालकामगारप्रकरणी चौकशीचे आदेश

Next

वाशिम : वाशिम शहरामध्ये सुरू असलेल्या रस्ता दुरूस्तीसाठी दगड फोडण्याच्या कामी बालमजुरांना जुंपले असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १२ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली. अतिरिक्त कामगार कल्याण अधिकारी पी.आर.महल्ले यांनी या कामी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागून आहे. वाशिम शहरामध्ये अकोला नाका ते पाटणी चौककडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्ता दुरूस्तीसाठी दगड फोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दगड फोडण्याच्या कामावर चक्क बालमजुर काम करताना ११ डिसेंबर रोजी दिसून आले होते. शासनाने १४ वर्षाच्या खालील मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये व त्याचे जीवन सुदृढ व्हावे यासाठी त्यांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासनस्तरावर कठोर नियमही केले आहेत. बालमजुरीला आळा बसावा यासाठी शासनाने १९८६ साली बालमजुरी कायद्याची स्थापना केली. मात्र, या बालमजुरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची बाब वाशिम शहरातील रस्ता कामाच्या दगड फोडण्याच्या प्रकरणाने अधोरेखीत केली. शासनाच्या नियमानुसार समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन याविषयी तक्रार दिल्यास बालकामगार ठेवणार्‍या व्यक्तींवर कारवाई करता येते. मात्र, स्थानिक पातळीवर यासाठी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे याप्रकरणी कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई करणे कठीण बाब असते. १२ डिसेंबर रोजी ह्यलोकमतह्णने बालमजुरीप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच, अतिरिक्त कामगार कल्याण अधिकारी महल्ले यांनी या कामी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Child labor inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.