बाल कामगारांचा शोधच नाही!
By admin | Published: June 12, 2014 09:28 PM2014-06-12T21:28:38+5:302014-06-12T21:36:02+5:30
मोहिमेने जवळपास ८२ व्यापारी संस्था व दुकांनामध्ये छापे टाकले. मात्र, केवळ एक बालकामगार हुडकून काढण्यात या मोहिमेला यश मिळाले.
वाशिम: जिल्हा बालकामगार कार्यालयाच्या वतीने संपूर्ण वाशिम जिल्हयात सन २0१३-२0१४ बालकामगार शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेने जवळपास ८२ व्यापारी संस्था व दुकांनामध्ये छापे टाकले. मात्र, केवळ एक बालकामगार हुडकून काढण्यात या मोहिमेला यश मिळाले.
प्रत्यक्षात जिल्हयामध्ये बालकामगारांची संख्या खुप मोठी आहे. ही बाब धक्कादायक असून बालकामगार कार्यालयाच्या वतीने संपूर्ण जिल्हयातच बालकामगार शोध मोहीम वेळोवेळी राबविण्याची गरज आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हयामध्ये दुकाने, व्यापारी संस्था, लॉजिंग, हॉटेल्स सिनेमा थियेटर नाटयगृह या अंतर्गत एकूण १ हजार ११४ संस्था तसेच सदर संस्थामध्ये एकूण ३ हजार २२ कामगार असल्याची अधिकृत नोंदणी संबंधित विभागाकडे करण्यात आलेली आहे. या शिवाय कामगार नसलेल्या एकूण ५ हजार ९७१ संस्थाचीसुद्धा अधिकृत नोंद झालेली आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्हयात सर्वत्र ठिकठिकाणी बालकामगार काम करीत असतानाचे चित्र पहावयास मिळत असून या बाबीकडे शासकीय अधिकारी कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. वाशिम शहरामध्ये ५४३ दुकांनामध्ये ८४0 कामगार, कर्मशियल तसेच बँका व अन्य व्यापारी संस्था असलेल्या ३६३ संस्थानमध्ये १४५ कामगार, १२३ हॉटेल्स मध्ये ३४५ कामगार, ५लॉगींग ९, ४ नाटयगृह सिनेमा थियेटरमध्ये २१ कामगार प्रत्यक्ष कामावर असल्याची नोंद असून २ हजार २६६ असलेल्या सर्व संस्थानमध्ये एकही कामगार वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरुळपीर तालुक्यामध्येच दुकाने व संस्था अधिनियम कायदा लागू असून कारंजा येथील सर्व ४९३ नोंदणीकृत संस्थामध्ये ११९२ कामगार तर मंगरुळपीर येथील २६३ संस्थामध्ये ४७९ कामगार असल्याची नोंद आहे कारंजा येथील २६९१ व मंगरुळपीर येथील १0२४ दुकाने व संस्थामध्ये कामगार नसल्याची नोंद आहे. जिल्हयातील रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये शॉपअँक्ट कायदा लागू नसल्यामुळे या तिनही तालुक्यांमध्ये बालकामगारांची संस्था मोठया प्रमाणात आहे वाशिम हे जिल्हयाचे मुख्यालय असून अकोल्याचे कामगार अधिकारी प्रशांत महल्ले यांच्याकडे वाशिम व बुलडाणा जिल्हयाचा प्रभार आहे. दुकान व संस्था अधिनियम कार्यायाचे कारकून खान व आत्माराम धनकर यांच्यावर वाशिम कार्यालयाची भिस्त असून दुकान निरीक्षकाचे पद रिक्त आहे. शिवाय दुकान संस्था सह कामगार कल्याण मंडळ तसेच घरेलू कामगार व इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणीचा अतिरिक्त भार खान व धनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे वाशिम जिल्हयात बालकामगार शोध पथक मोहीम वारंवार राबविण्याची गरज असून ठिकठिकाणी बालकामगारांच्या हक्कासाठी व न्यायासाठी चर्चा सत्रे, मेळावे, जगनजागरण व बालकामगार शोध पथक मोहीम राबविणे आवश्यक आहे.