रेल्वे स्थानकावर बालकामगार करतोय पाणी भरण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:29 PM2017-08-02T13:29:19+5:302017-08-02T13:32:35+5:30

अजमेर - हैद्राबाद ही रेल्वे दुपारी ४ वाजता अमानवाडी रेल्वेस्टेशनवर पोहचल्यानंतर त्यामध्ये बालकामगार पाणी भरत असल्याचे आढळले.

child labour working on railway station | रेल्वे स्थानकावर बालकामगार करतोय पाणी भरण्याचे काम

रेल्वे स्थानकावर बालकामगार करतोय पाणी भरण्याचे काम

Next

वाशिम, दि. 2 - अमानवाडी रेल्वेस्थानकावर अनेक रेल्वे १५ ते २० मिनिटे थांबून रेल्वेत पाणी भरतात. शनिवारी अजमेर - हैद्राबाद ही रेल्वे दुपारी ४ वाजता अमानवाडी रेल्वेस्टेशनवर पोहचल्यानंतर त्यामध्ये बालकामगार पाणी भरत असल्याचे आढळले. या ठिकाणी या कार्यासाठी रेल्वे कर्मचा-याची नियुक्त केल्याची माहिती आहे. 
अमानवाडी रेल्वे स्थानकावर शनिवार, गुरुवारी अजमेर-हैद्राबाद तर सोमवारी यशवंतपूर- इंदोर गाडया थांबतात. अमानवाडी रेल्वेस्थानकावर रेल्वेत पाणी भरण्यासाठी विशेष व्यवस्था असल्याने या गाडया येथे थांबतात. विशेष म्हणजे याकामाकरीता अकोला येथून कर्मचारी येत असल्याची माहिती आहे. शनिवारी अमानवाडी रेल्वेस्टेशनवर गाडी नंबर १२७१९ जयपूर- अजमेर- हैदा्रबाद येथे रेल्वेत पाणी भरतांना बालकामगार आढळून आला.

रेल्वेमध्ये पाणी भरण्यासाठी कर्मचारी अकोला येथून येतात. या प्रकाराबाबत आपल्याला काही माहिती नसून हा प्रकार कधी आपल्या निदर्शनास आलेला नाही.
- अरविंदकुमार सिंग, स्टेशन मास्टर, अमानवाडी
 

Web Title: child labour working on railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.