वाशिम जिल्ह्यात स्थापन होणार बालहक्क रक्षण समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:44 AM2019-08-21T10:44:32+5:302019-08-21T10:44:37+5:30
ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हयात तीन टप्प्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) आणि युनिसेफने पुढाकार घेतल्याची माहिती ‘व्हीएसटीएफ’चे जिल्हा समन्वयक वासूदेव ढोणे यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील २५ जिल्हे व ८५० गावांमध्ये सलग तीन महिने विशेष मोहीम राबवून लोकांना मुख्यत: बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. ३० आॅगष्टपर्यत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित केले जातील. तसेच मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात बालहक्क रक्षण समित्या स्थापन करुन कार्य सुरू करतील. हे कार्यकर्ते बालकांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करतील.
११ आॅक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालीका दिनापासून सुरु होणाºया दुसºया टप्प्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून युनिसेफ अधिकाऱ्यांच्या सहभागातून बालकांच्या समस्यांवर चर्चेसाठी शाळा व बचतगटांच्या बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये वाढत्या वयानुसार बालकांमध्ये होणाºया बदलाच्या माहितीसह युनिसेफने तयार केलेली माहितीपत्रके, पुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना देवून बालहक्क आणि बालविवाह या विषयावर तयार केलेली विविध माहितीपट दाखविले जातील.
१४ नोव्हेंबरपासून सुरु होणाºया तिसºया व शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यासह कायदे, इतर उपाययोजनांची माहिती दिल्या जाईल.
बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची, याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठीची साह्यसेवा मिळवण्यासाठी तसेच तक्रार नोंदविण्यासाठीच्या दूरध्वनी क्रमांकांची त्यांना माहिती दिली जाणार आहे.
युनिसेफ आणि व्हीएसटीएफच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविल्या जाणाºया विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात बालहक्क आणि बालविवाह या गंभीर मुद्यांबाबत भविष्यात योग्य कृती करण्याची मानसिकता ग्रामीण भागात पक्की होईल. याअंतर्गत कारंजातील ५ व मालेगाव तालुक्यातील २ अशा ७ ग्रामपंचायतींमध्ये समित्या गठीत केल्या जाणार आहे.
- वासूदेव ढोणे
जिल्हा समन्वयक, ‘व्हीएसटीएफ’, वाशिम