बालहक्कांना हवे संरक्षण!
By admin | Published: May 31, 2014 12:27 AM2014-05-31T00:27:26+5:302014-05-31T00:50:35+5:30
बालकांवर अन्याय सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे.
संतोष वानखडे/ वाशिम
विविध कायदे व यंत्रणांचे बालकांच्या हक्काला संरक्षण असले; तरी संरक्षणाचे सदर कवच भेदून बालकांवर अन्याय-अत्याचाराचा मारा सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे. २00८ मध्ये गंभीर स्वरुपाच्या अन्याय-अत्याचाराला राज्यातील २७0९ बालकं बळी पडली होती. हा आकडा २0१२ मध्ये ३४५६ वर पोहोचला आहे. तर २0१३ मध्ये या आकड्याने साडेतीन हजाराचा टप्पा पार केला. यावरून बालकांच्या हक्कांना संरक्षण देणार्या यंत्रणेत किती कार्यक्षम आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. खेळण्या-बागडण्याच्या वयातच अनेक बालकं अन्याय-अत्याचाराची शिकार ठरतात. सर्वच घटकातील व स्तरातील बालकांच्या पंखात आत्मविश्वास, स्वातंत्र्य, निर्भयता, प्रेरणा, न्याय, मुक्त संचाराचे बळ भरण्यासाठी आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी ज्येष्ठांना उपदेशाचा डोज पाजण्यासाठी ३१ मे रोजी जागतिक स्तरावर ह्यबालक दिनह्ण साजरा केला जातो. राज्यात २00८ मध्ये १७८ बालकांचे खून, ६९0 बालिकांवर बलात्कार, ५९८ बालकांना पळवून देणे यासह २७0९ गुन्हे विविध कलमांखाली नोंदले गेले आहेत. हाच आकडा २0१२ सालात चांगलाच फुगला आहे. २0१२ मध्ये २१२ खून, ९१७ बलात्कार, ८९३ पळवून नेणे यासह एकूण ३४५६ घटनांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. २0१३ मध्ये बालकांवर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांनी ३५७८ चा आकडा गाठला.