बालपण हिरावतेय ‘माेबाईल गेम’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:51+5:302021-03-04T05:18:51+5:30
काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता, शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. अनेक शाळांच्यावतीने ऑनलाईन क्लासेस घेतले जात आहेत. ऑनलाईन क्लास २ ...
काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता, शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. अनेक शाळांच्यावतीने ऑनलाईन क्लासेस घेतले जात आहेत. ऑनलाईन क्लास २ ते ३ तासांच्या वर घेतले जात नाहीत. त्यानंतर मुले मात्र पूर्णपणे माेबाईलमध्ये खेळताना दिसून येत आहेत. अनेकदा पालक माेबाईलमध्ये काय करीत आहेत, याची विचारणाही करतात; परंतु बालकांकडून हाेमवर्क, क्लास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही बालके तर चक्क माेबाईल घराबाहेर नेऊन मित्रांसाेबत माेबाईल गेम खेळत असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून येत आहे.
माेबाईल वेड लागलेल्या बालकांकडे पालकांनी लक्ष देऊन मुलांशी संवाद वाढविणे गरजेचे बनले आहे. अनेक बालके तर ऑनलाईन गेमसुध्दा खेळत असल्याचे दिसून येत आहे. पालकांनी याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या पाल्यांकडून माेबाईलचा वापर खराेखर याेग्य हाेताे की नाही, याची पडताळणी पालकांनी करणे आवश्यक ठरत आहे.
....................
माेबाईल गेमचे दुष्परिणाम
वागण्या-बाेलण्यात अचानक बदल
चिडचिडेपणात वाढ
सहनशक्ती कमी हाेणे
अधिक आक्रमकता अंगी येणे
एकटे राहणे
घ्यावयाची खबरदारी
पालकांनी मुलांशी संवाद वाढविण्यावर भर देणे
मुलांमध्ये नैसर्गिक खेळाची आवड निर्माण करणे
माेबाईलचा वापर करताना किती आवश्यक आहे हे पाहून वेळमर्यादा ठरवून देणे