मंगरुळपीर येथे बाल कला महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:37+5:302021-02-05T09:21:37+5:30
बालकांच्या कलागुणांना वाव देण्याचे उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षीचा बालकला महोत्सव हा ...
बालकांच्या कलागुणांना वाव देण्याचे उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षीचा बालकला महोत्सव हा कार्यक्रम मंगरुळपीर, मानोरा, पार्डी टकमोर, शेंदुर्जना आढाव, शेलूबाजार, धाकली आणि महान या सात सेंटरवर पार पडला. यामध्ये ४८० पैकी ४५० मुले सहभागी झाले होते. यामध्ये ३० मुलांना पारितोषिक, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, अजय खिराडे, चव्हाण, वाघमारे हे उपस्थित होते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आणि एकल नृत्य स्पर्धा या सर्व स्पर्धेमधील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कर्यक्रमाला यशवीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या वाशिम विभागाचे प्रकल्प अधिकारी रामहरी इरकर, मोहन चवरे, कोमल तिरपुडे, विजय खडसे, समाधान ठाकरे, प्रकाश सावंत, नारायण इंगोले, विनोद राऊत, आकाश इरकर, रामेश्वर अंभोरे आणि सातही सेंटरमधून शिक्षकांचा सहभाग लाभला.