लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:28+5:302021-08-21T04:46:28+5:30

०००००००००००००००००००० ५० टक्के मुलांची कोरोना चाचणी -जिल्ह्यात कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. -ग्रामीण भागात नऊ ...

Children's health deteriorated; Triple increase in OPD! | लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ!

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ!

Next

००००००००००००००००००००

५० टक्के मुलांची कोरोना चाचणी

-जिल्ह्यात कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

-ग्रामीण भागात नऊ टक्के मुले पहिल्या लाटेत बाधित झाली होती. मुले बाधित येण्याचे प्रमाण जवळपास १ टक्क्याहून कमीच होते.

०००००००००००००००००००००००

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेल्या मुलांना उपचार दिल्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जात आहे. शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जवळपास ३५ रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.

००००००००००००००००००००

कोट :

सध्या पावसाच्या दिवसांत मुलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. यात वातावरणातील बदल हे एक कारण आहेच; पण त्याचवेळी दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घर व परिसरातील स्वच्छता या काळात अत्यंत गरजेची आहे.

-डॉ. विजय कानडे,

बालरोगतज्ज्ञ

कोट :

लहान मुले पावसात खेळतात, भिजतात. यातून सर्दी, ताप, असे आजार होतात. डासांपासून मलेरिया, डेंग्यू आजारांची भीती आहे. त्यामुळे या काळात सांभाळणे गरजेचे आहे. सकस आहारही मुलांच्या आरोग्यात महत्त्वाची बाब आहे.

-डॉ. नवल सारडा,

बालरोगतज्ज्ञ

...ही घ्या काळजी

-सध्याचे आजार गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे ताप आल्यानंतर अंगावर काढू नये. डॉक्टरशी संपर्क साधायलाच हवा.

-डासांपासून बचावासाठी लहान मुलांना अंगभर कपडे घालावेत.

-घरात कोरोनाबाधित व्यक्ती असेल, तर त्यांनी विशेष काळजी घेऊन लहान मुलांना दूर ठेवावे, जर ताप आला असेल, तर त्याला तात्काळ डॉक्टरांकडे न्यावे.

Web Title: Children's health deteriorated; Triple increase in OPD!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.