लॉटरी पद्धतीतून होणार लाभार्थींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:37 PM2017-09-27T20:37:00+5:302017-09-27T20:37:18+5:30

वाशिम : गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. 

The choice of beneficiaries through the lottery system | लॉटरी पद्धतीतून होणार लाभार्थींची निवड

लॉटरी पद्धतीतून होणार लाभार्थींची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देगोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. 
कृषि विभागामार्फत वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फ्लेक्झी फंड बाबीमधून शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी गोदाम बांधकामाचा लाभ घेऊ शकतात. गोदाम बांधकामासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १२.५० लाख अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी ३ गोदाम बांधकामाचे उद्दिष्ट मिळाले आहे. याकरिता जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी किंवा वैयक्तिक शेतकºयांकडून १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी बुधवारी केले.

Web Title: The choice of beneficiaries through the lottery system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.