ऑनलाईन फसणुकीबाबत नागरिकांची सावधानता; दाेन वर्षात एकाचीही फसवणूक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:58+5:302021-06-19T04:26:58+5:30
अनेक ॲप्स डाऊनलाेड करताना काही प्रश्न विचारले जातात. ते न वाचताच ‘ॲग्री’ केले जाते. यातून ही फसवणूक हाेतेय. जिल्ह्यातही ...
अनेक ॲप्स डाऊनलाेड करताना काही प्रश्न विचारले जातात. ते न वाचताच ‘ॲग्री’ केले जाते. यातून ही फसवणूक हाेतेय. जिल्ह्यातही अशा फसवणूक झाल्या असल्या तरी सायबर सेलकडे मात्र काेणीही तक्रार दाखल न केल्याने दाेन वर्षात एकाही नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाली नाही, असे दिसून येते. असे असले तरी तुमचा माेबाईल उद्या बंद पडणार, व्हेरिफिकेशन करा, अशा ५१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
------------
सायबर सेलकडून वेळाेवेळी जनजागृती
नागरिकांची ऑनलाईन फसवणूक हाेऊ नये, याकरिता सायबर सेलकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते.
पाेलीस विभागाच्यावतीने सायबर गुन्ह्याची माहिती असलेल्या तज्ज्ञांचे अनेक काॅलेजेस, शाळांमध्ये कॅम्पचेही आयाेजन करून नागरिकांची कशी फसवणूक हाेऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले जाते.
वर्षभरात ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कार्यक्रम हाेताे.
------------
अनोळखी ॲप नकोच
ऑनलाईन फसवणूक हाेऊ नये, याकरिता माेबाईल कसा हाताळावा व काय खबरदारी घ्यावी, याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. काेणताही मेसेज आल्यास पूर्णपणे समजून घेऊनच त्याला हाेकार देणे आवश्यक आहे.
शक्यताे अनाेळखी असलेले ॲप डाऊनलाेड करू नये. अनेक वेळा अनेक ॲपच्या जाहिराती येतात, याला बळी पडू नये.
------------
सावधानता न बाळगल्यास ऑनलाईन फसवणूक अटळ आहे. नागरिकांनी काेणतेही ॲप्स, गेम्ससह काहीही माेबाईलमध्ये डाऊनलाेड करताना तसेच ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी. समजेल ताेच व्यवहार करावा, म्हणजे फसवणूक टळेल.
अजयकुमार वाढवे,
सायबर सेल प्रमुख, वाशिम