रक्ताची नाती जोडण्यासाठी नागरिकांचा पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:07 PM2018-05-04T15:07:40+5:302018-05-04T15:07:40+5:30

 वाशिम : रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे.

Citizen initiatives to add blood relations! | रक्ताची नाती जोडण्यासाठी नागरिकांचा पुढाकार !

रक्ताची नाती जोडण्यासाठी नागरिकांचा पुढाकार !

googlenewsNext
ठळक मुद्देरक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जाते. राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. एकूण आणि ऐच्छिक रक्तसंकलन यावर नजर टाकली तर ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ कमालिचा वाढत असल्याचे दिसून येते.

 वाशिम : रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०.८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१७-१८ मध्ये १७ लाख यूनिटवर गेले आहे. 

रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जाते. एखाद्याला जीवदान देण्यासाठी आता सर्व वयोगटातील नागरिक समोर येत असल्याने साहजिकच रक्तपेढीतील ऐच्छिक रक्तसंकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते.  

राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. १०.८६ लाख युनिट म्हणजे १०.८६ लाख बॅग. अर्थात रक्तदातेही १०.८६ लाख! २०११ मध्ये २८२ रक्तपेढ्यांतून ११.९२ लाख युनिट, २०१२ मध्ये २९१ रक्तपेढ्यांतून १३.२९ लाख युनिट, २०१३ मध्ये ३०० रक्तपेढ्यांतून १३.९० लाख युनिट आणि २०१४ मध्ये ३१० रक्तपेढ्यांतून १४.९२ लाख युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दप्तरी आहे. सन २०१५-१६ मध्ये ३१७ रक्तपेढ्यातून १५.६६ लाख युनिट, सन २०१६-१७ मध्ये ३२१ रक्तपेढ्यातून १६.१७ लाख युनिट तर सन २०१७-१८ मध्ये ३३१ रक्तपेढ्यातून १७ लाख युनिट रक्तसंकलन करण्यात आले.

एकूण आणि ऐच्छिक रक्तसंकलन यावर नजर टाकली तर ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ कमालिचा वाढत असल्याचे दिसून येते. २०१० मध्ये एकूण रक्तसंकलन १२.६६ लाख युनिट होते. यापैकी १०.८६ लाख युनिट रक्त संकलन ऐच्छिक रक्तदानातून झाले होते. २०१४ मध्ये १५.५९ पैकी १४.९२ लाख युनिट ऐच्छिक रक्तदानातून झालेले आहे. २०१६-१७ मध्ये एकूण रक्तसंकलन १७ लाख युनिट होते. यापैकी १५.७५ लाख युनिट रक्त संकलन ऐच्छिक रक्तदानातून झाले होते. 


 रक्तदानाला लोकचळवळीचे स्वरुप येत असल्याने साहजिकच ऐच्छिक रक्तदातेही वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रक्तदानासाठी जनजागृती केली जाते. त्यामुळे साहजिकच रक्तदात्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेलादेखील रक्तदानाचे महत्त्व पटल्याने समाधानकारक रक्त संकलन होत आहे.

- डॉ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम.

Web Title: Citizen initiatives to add blood relations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम