नागरिकांनी काेराेना लस घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:17+5:302021-03-29T04:23:17+5:30
कारंजा शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनात कोरोना प्रतिबंधक पथक तयार करून त्या ...
कारंजा शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनात कोरोना प्रतिबंधक पथक तयार करून त्या पथकाच्या माध्यमातून शहरातील व्यावसायिक सामाजिक अंतर राखून व्यवसाय करीत नसतील तर त्यांना दंड आकारण्यात येत आहे. या दोन दिवसात २० हजार रुपये दंड पथकाच्या माध्यमातून वसूल केला तर विना मास्क फिरणा-यांनासुद्धा दंड आकारून कार्यवाही करण्याची धडक मोहीम आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, राहुल सांवत यांच्याकडून सुरू आहे.
बाॅक्स....
कारंजा शहरात कोरोना लसीकरणाचे दुसरे केंद्र मुलजी जेठा हायस्कूल या ठिकाणी २७ मार्चपासून सुरू करण्यात आले. या केंद्रावर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करण्याचा शुभारंभ तहसीलदार धीरज मांजरे व मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, गटविकास अधिकारी कालीदास तापी, आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, मुलजी जेठा हायस्कूलचे मुख्याधापक रमेश निशाणराव, वैद्यकीय अधीक्षक डाॅ नथ्थुराम सोळंके, सर्वधर्म आपत्काकालीन पथकाचे अध्यक्ष श्याम सवाई यांच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला. ४५ वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
बाॅक्स .....
शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक पथकाच्या माध्यमातून मुख्याधिकारी डोल्हारकर यांच्या मागदर्शनाखाली पथक प्रमुख राहुल सावंत व्यावसायिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन कराीत आहेत. ज्या व्यावसायिकांनी कोरोना चाचणी केली नाही अशांनी आपली दुकांने बंद ठेवावी अन्यथा ५०० रुपये दंड भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करणा-यांची संख्या वाढली आहे.