नागरिकांना ‘मास्क’चा विसर; बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:11+5:302021-01-09T04:34:11+5:30
................... विहीर योजनेबाबत लाभार्थी संभ्रमात वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ...
...................
विहीर योजनेबाबत लाभार्थी संभ्रमात
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर आणि सिंचन साधने उपलब्ध करून दिली जातात; मात्र गतवर्षी अर्ज मागविण्यात आले नसल्याने लाभार्थी संभ्रमात सापडले आहेत.
...................
विद्युतपुरवठा अनियमित; सिंचन प्रभावित
तोंडगाव : सध्या रबी हंगामातील पिकांसाठी सिंचन करणे सुरू आहे. असे असताना विद्युतपुरवठा अनियमित असल्याने सिंचनाचे काम प्रभावित होत आहे. त्याचा थेट परिणाम होऊन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
............
नियमित नालेसफाईकडे दुर्लक्ष
रिठद : वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोग बळावले आहेत. असे असताना नियमित नालेसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष पुरविण्याची मागणी संदीप आरू यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे.
...............
खंडाळा येथे कोरोना रुग्ण
मानोरा : तालुक्यातील खंडाळा येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल ८ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
...............
कालवे नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय
अनसिंग : अनसिंग परिसरात सध्या रबीच्या पिकांची स्थिती चांगली आहे. दुसरीकडे पिकांच्या सिंचनासाठी धरणामधील पाणी घेण्याकरिता असलेले कालवे नादुरुस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.
....................
सौर कृषिपंप योजना थंडबस्त्यात
वाशिम : महावितरणकडून राबविण्यात येणारी सौर कृषिपंप योजना गेल्या काही दिवसांपासून थंडबस्त्यात सापडली आहे. सौर कृषिपंपांकरिता अर्ज करूनही अनेकांना पंप मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती
मालेगाव : वाशिम ते अकोला यादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. मालेगावपासून वाशिमपर्यंतच्या रस्तानिर्मितीला चांगलीच गती मिळाली असून, हे काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.
....................
रोहयोची कामे ठप्प; मजुरांची परवड
मालेगाव : तालुक्यातील काही गावांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गतवर्षी रोहयोची कामे ठप्प पडली. परिणामी, खऱ्या मजुरांची परवड होत आहे.
..................
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
कारंजा लाड : शहरासह ग्रामीण भागातील दुकानांमध्ये, भाजीपाला विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. बंदी असूनही प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
......................
नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : विनापरवाना वाहने चालवून नियम तोडणाऱ्यांवर शहर वाहतूक विभागाच्या पथकाने गुरुवारी धडक कारवाई केली. याअंतर्गत वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगनजीक दिवसभर पथक तैनात असल्याचे दिसून आले.