नागरिकांनाे, घरी ‘लव्हबर्ड्स’ पाळणे ठरू शकतेय धाेक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:57+5:302021-07-14T04:45:57+5:30
वाशिम : अनेकांच्या घरी लव्हबर्ड पाळणे हा छंद जोपासला जातो. मात्र आता हा छंद धोक्याचा ठरू शकतो. १० ...
वाशिम : अनेकांच्या घरी लव्हबर्ड पाळणे हा छंद जोपासला जातो. मात्र आता हा छंद धोक्याचा ठरू शकतो. १० जुलै राेजी वाशिमच्या रिसोड शहरातील एकतानगर येथील किशोर अवचार यांच्या घरामध्ये किंग कोबरा जातीचा साप हा चक्क लव्हबर्डच्या पिंजऱ्यात आढळून आल्याने अवचार कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडाली हाेती.
हा कोब्रा साप अवचार यांच्या घरातील लव्हबर्डच्या पिंजऱ्यातील पक्षी भक्षण करण्याकरिता आला असल्याने यावेळी या सापाने या पिंजऱ्यातील सहा पक्षाचे भक्षणही केले. मात्र रिसोड शहरातील नामांकित सर्पमित्र श्याम तिवारी यांना ही माहिती मिळताच त्यांनी काही क्षणात तेथे पोहोचून सापाला लवबर्डच्या पिंजऱ्यातुन बाहेर काढले व जंगलात नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडून त्याला जीवनदान देण्यात आले