नागरिकांचे मास्क हनुवटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:49+5:302021-06-09T04:50:49+5:30

जनुना-चाैसाळा रस्त्याची दुरवस्था मानोरा : तालुक्यातील जनुना ते चौसाळा या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...

Citizen's mask on the chin | नागरिकांचे मास्क हनुवटीवर

नागरिकांचे मास्क हनुवटीवर

Next

जनुना-चाैसाळा रस्त्याची दुरवस्था

मानोरा : तालुक्यातील जनुना ते चौसाळा या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे.

घरकुलांचा शेवटचा हप्ता प्रलंबित

वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून दीड वर्ष होऊनही कारंजा तालुक्यातील अनेक लाभार्थींना शेवटचा हप्ता मिळाला नाही. अनुदान मिळत नसल्याने लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी

वाशिम : सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा स्त्री रुग्णालय या रस्त्यावरील सामाजिक न्याय भवननजीक रस्त्याची बाजू खोलगट झाली आहे. रस्त्याच्या कडा भरून गैरसोय टाळण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

अरुंद रस्त्यामुळे रहदारीस अडथळा

अनसिंग : येथील अनेक भागात अरुंद रस्त्यांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुणाच्या घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होत असून, रस्ते रुंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष

मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले. मात्र, या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून, त्यास गती देण्याची मागणी होत आहे.

रोहित्र नादुरुस्त; सिंचनात व्यत्यय

वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Citizen's mask on the chin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.