अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:05+5:302021-03-27T04:43:05+5:30
यासंदर्भातील निवेदनात नमूद आहे की, वार्ड क्र. १ शिवाजी नगरमधील सर्वे नं. ३०४/२ जुन्या एन ऑर्डरनुसार लेआऊटमधील खुली जागा ...
यासंदर्भातील निवेदनात नमूद आहे की, वार्ड क्र. १ शिवाजी नगरमधील सर्वे नं. ३०४/२ जुन्या एन ऑर्डरनुसार लेआऊटमधील खुली जागा १८७६.८ चौ.मी. दर्शविण्यात आली आहे. या जागेवर पूर्वी अतिक्रमण करण्यात आले होते. ते काढण्याबाबत रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानुसार हे अतिक्रमण न.प. प्रशासनाने काढून सदर जागा मोकळी केली होती; परंतु पुन्हा संबंधित त्याच व्यक्तीने अतिक्रमण करुन जागा ताब्यात घेतली आहे. दरम्यान, हे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपालआप्पा महाजन, ललित वायले, मयुर शेळके यांच्यासह अन्य रहिवाशांनी प्रशासनाकडे केली. त्याची दखल घेत न.प. अध्यक्ष अशोक हेडा, नगरसेवक अतुल वाटाणे, अनिल ताजणे यांनी शिवाजी नगरमध्ये भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली व जागेची मोजणी करुन एक महिन्याच्या आत अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.