लसीकरणासाठी रिसोड येथे नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:35+5:302021-04-27T04:42:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून वारंवार केले जात ...

Citizens rally at Risod for vaccination | लसीकरणासाठी रिसोड येथे नागरिकांची झुंबड

लसीकरणासाठी रिसोड येथे नागरिकांची झुंबड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रिसोड : मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून वारंवार केले जात असले, तरी आरोग्य यंत्रणेच्या कार्यालयातच या दोन्ही नियमांचा कसा फज्जा उडतो, हे सोमवारी, २६ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथील केंद्रात नागरिकांनी एकच गर्दी केल्याने पाहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावे, या त्रिसुत्रीचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे दिल्या जातात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. रिसोड येथेही ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात लसीकरण केले जात आहे. मागील आठवड्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने काही दिवस लसीकरण केंद्रात लस देणे बंद होते. कोरोना लसीचे डोस प्राप्त झाल्याने येथे लसीकरण सुरू झाले आहे. लस घेण्यासाठी सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे येथे दिसून आले. गर्दी हटविण्यासाठी किंवा रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगने उभे राहण्यासाठी कुणी कर्मचारी बाहेर आला नाही किंवा सूचना दिल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर कोरोनाविषयक नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. रिसोड शहराची लोकसंख्या जवळपास ४५ हजार आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे एकमेव लसीकरण केंद्र असल्यामुळे नागरिकांची गर्दी होत आहे. याठिकाणी कोरोना नियमांचे पालनही होत नाही. याबाबत तहसीलदार अजित शेलार यांच्याशी दूरधनीद्वारे संपर्क साधला असता, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. दिनांक १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाने तत्काळ लसीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Citizens rally at Risod for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.