नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:35+5:302021-06-20T04:27:35+5:30

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार माजविला होता शासनाने लॉकडाऊन लावत यावर नियंत्रण मिळविले, तर प्रशासनाकडून नागरिकांना ...

Citizens should benefit from free vaccinations | नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा

नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा

Next

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार माजविला होता शासनाने लॉकडाऊन लावत यावर नियंत्रण मिळविले, तर प्रशासनाकडून नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करतानाच, विविध उपाययोजना केल्याने कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे.

अद्यापही कोरोनाचा धोका दूर झाला नाही. लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन आपले व समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, या उद्देशाने समता फाउंडेशनने रिसोड शहरासाठी मोफत लसीकरण करण्याचा संकल्प घेतला आणि या लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात करून राज्यातच नव्हे, तर देशात मोफत लसीकरणाची पहिली स्वयंसेवी मोहीम सुरू केली. सद्यस्थितीत शहरातील पाच ठिकाणी लसीकरण केंद्र उभारून शहरातील नागरिकांना मोफत लसीकरण देण्यात येत आहे. लसीकरणाची सुरुवात ५ जून रोजी झाली असून, २७ जूनपर्यंत ही मोहीम चालणार आहे. अजूनही शहरातील काही नागरिक लसीकरण करून घेण्याचे बाकी असल्याने उर्वरित सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष विजयमाला कृष्णा आसनकर यांनी केले आहे

Web Title: Citizens should benefit from free vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.