कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:53+5:302021-02-20T05:55:53+5:30
पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, ...
पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले की, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्या जिल्ह्यात हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे. प्रत्येक व्यक्तीने घरबाहेर पडताना चेहºयावर मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रमांना ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे. या मर्यादेतच समारंभ आयोजित करावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहावे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी. आजूबाजूंच्या जिल्ह्यांत रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात येणाºया व्यक्तींची आरोग्य तपासणी सुरु करावी. जिल्ह्यात आढळणाºया प्रत्येक कोरोना बाधिताच्या संपर्काकातील किमान २० लोकांचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करावी. कोरोना बाधितांची वाढ लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आवश्यक सज्जता ठेवावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती दिली.