कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:28+5:302021-04-01T04:42:28+5:30
वारा जहाँगीर फिडरला मंगरूळपिर उपविभाग अंतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो, परंतु हा वीजपुरवठा कमीदाबाचा, ...
वारा जहाँगीर फिडरला मंगरूळपिर उपविभाग अंतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो, परंतु हा वीजपुरवठा कमीदाबाचा, तसेच सिंगलफेज देत असल्याने वारा जहा, देपूळ, लही, कुंभी, वसंतवाडी इत्यादी गावच्या वीज ग्राहकाच्या विद्युत उपकरण नादुरुस्त होत आहेत, तसेच कडक उन्हात कुलर, फॅन चालत नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. आसेगाव विद्युत उपकेंद्रावरून प्रभारी कनिष्ट अभियंता पी.खाडे हे धानोरा, शेगी, फीडरला दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा देतात. मात्र, वारा जहाॅ.फीडरला सिंगल फेज पुरवठा देतात. या संदर्भात त्यांना भेटले असता, ते भेटत नाहीत, फोनही उचलत नाहीत. या प्रकरणी मुख्य अभियंत्यांनी, तसेच अधीक्षक अभियंत्यांनी सखोल चौकशी करावी व वारा फिडरचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी वीज ग्राहकांकडून मागणी होत आहे.
---------------------------------
सदर प्रकाराबाबत रीतसर तक्रार दाखल करा, कडक कार्यवाही केली जाईल.
-हिरालाल जांभुळकर
उपविभागीय अभियंता, विद्युत वितरण कंपनी उपविभाग मंगरुळपीर