विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:31+5:302021-06-16T04:54:31+5:30
मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या ...
मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसापासून नेहमी वीजपुरवठा खंडित असतो. चुकून एखादे वेळी वीजपुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडित होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात बिघाड होत आहे. पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे ऑनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीजपुरवठा खंडित राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्युटरमध्ये बिघाड येत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.