नागरिकांनाे... वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:28+5:302021-07-17T04:30:28+5:30
वाशिम : गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पडून गतवर्षी अनेक जणांचे बळी गेले. वीज कडाडताच माेबाईल बंद ...
वाशिम : गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पडून गतवर्षी अनेक जणांचे बळी गेले. वीज कडाडताच माेबाईल बंद करा, झाडांपासून दूर रहा, यासह घ्यावयाच्या खबरदारीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्ह्यात केवळ ४ ठिकाणीच वीज अटकाव यंत्रणा असून, वीज कडाडतांना नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. काही ठिकाणी जीवितहानी, तर काही ठिकाणी जनावरेही दगावली. इतर मागण्यांप्रमाणेच तिला सरकार दरबारी वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत.
.....
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी....
शेतात काम करीत असाल तर जिथे आहात तिथेच राहावे. पायाखाली लाकूड, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा. आपले वाहन विजेचे खांब, झाडे यांपासून दूर ठेवा.
.....
जिल्ह्यात ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा
वाशिम जिल्ह्यात केवळ ४ ठिकाणीच वीज अटकाव यंत्रणा असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली.
जिल्ह्यातील वाशिमसह डव्हा, कारंजा येथेच वीज अटकाव यंत्रणा अस्तित्त्वात आहे. मानाेरा, रिसाेडमध्ये नाही.
जिल्हयात वीज अटकाव यंत्रणा कमी प्रमाणात असून, ही वाढविणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
....
वीज पडल्यास मुख्यत: मानवी हृदय श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो. विद्युत आघात झाल्यास लगेच हृदयाजवळील भागाच्या परिसराला मालिश करावे. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.
-शाहू भगत
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी