सहा एकरावर ‘सिट्रोनेला गवत’ शेतीचा प्रयोग; उत्तर प्रदेशात तेल विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:38 AM2020-08-23T11:38:00+5:302020-08-23T11:38:25+5:30

या गवतापासून तेल निर्मिती करीत याची विक्री उत्तर प्रदेशात केली जाते.

‘Citronella grass’ farming experiment on six acres; Oil sales in Uttar Pradesh! | सहा एकरावर ‘सिट्रोनेला गवत’ शेतीचा प्रयोग; उत्तर प्रदेशात तेल विक्री !

सहा एकरावर ‘सिट्रोनेला गवत’ शेतीचा प्रयोग; उत्तर प्रदेशात तेल विक्री !

Next

- प्रफुल बानगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पारपांरीक शेतीला फाटा देत कारंजा येथील धनंजय गहाणकरी या शेतकऱ्याने कामठवाडा शेत शिवारात दोन वर्षापूर्वी सहा एकर शेतीत सिट्रोनेला गवताची लागवड केली. या गवतापासून तेल निर्मिती करीत याची विक्री उत्तर प्रदेशात केली जाते.
कारंजा येथील धनंजय गहाणकरी हे अडीच वर्षांपूर्वी शेतकरी अभ्यास दौºयावर गेले होते. यावेळी त्यांच्या निदर्शनात सेट्रोनेला गवत शेती आली. सेट्रोनेला शेतीची त्यांनी कृषी विभाग व संबंधित शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. एक अभिनव प्रयोग म्हणून त्यांनी गवत शेती करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. कारंजापासून सहा किलोमिटर अतंरावर असलेल्या सहा एकर शेतात त्यांनी दोन वर्षापासून सिट्रोनेला गवताची लागवड केली. एकदा या गवताची लागवड केल्यानंतर पाच वर्षे याच लावगडीवर उत्पन्न घेता येते. या गवताला कोणतेही जनावर खात नसून फवारणी व ईतर रासायनिक औषधाचा खर्चही नाही. गवताची वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करण्यात येते. त्यानुसार कापलेल्या गवतावर शेतात तापत्या पाण्यासोबत प्रक्रिया करून तेल काढण्यात येते. एका एकारात वर्षातून अंदाजे ९० ते १०० किलो तेल काढण्यात येते. त्यामुळे सहा एकरात ६०० किलो तेलाचे उत्पन्न घेतले जाते. हे तेल ८०० ते एक हजार रुपये दराने मार्केटच्या परिस्थितीनुसार उत्तर प्रदेशातील लखनौ व कानपुर या जिल्ह्यात विकल्या जाते. बहुवार्षिक सुगंधी वनस्पतीपासून काढलेल्या तेलाचा उपयोग आयुर्वेदीक औषध बनविण्यासाठी केला जातो तसेच मच्छर प्रतिबंधक म्हणून याचा वापर होतो. त्यामुळे या तेलाला मागणी असल्याचे गहाणकरी सांगतात.

सिट्रोनेला गवतापासून तेल काढण्याचा प्रयोग धनंजय गहाणकरी यांनी यशस्वी साकारला आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन सिट्रोनेला गवत शेती केल्याने उत्पन्नातही चांगलीच वाढ झाल्याचे गहाणकरी अभिमानाने सांगतात.

पारंपारिक पिकात बदल करून औषधी व सुगंधी गवत शेतीच्या माध्यमातून धनंजय गहाणकरी यांनी सहा एकरावर लागवड केली. कमी खर्चात शाश्वत उत्पन्न ते घेत आहेत. इतर शेतकºयांसाठी हा प्रयोग आदर्श आहे.
- संतोष वाळके
तालुका कृषी अधिकारी कारंजा

Web Title: ‘Citronella grass’ farming experiment on six acres; Oil sales in Uttar Pradesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.