नगर परिषदेने जागाेजागी खाेदून ठेवले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:36+5:302021-01-09T04:33:36+5:30
वाशिम शहरातील विविध भागात नवीन नळजाेडणी देण्यात येत आहे. नवीन जाेडणी देण्याकरिता ठरावीक जागेवर पाइप नेताना रस्ता खाेदून पाईप ...
वाशिम शहरातील विविध भागात नवीन नळजाेडणी देण्यात येत आहे. नवीन जाेडणी देण्याकरिता ठरावीक जागेवर पाइप नेताना रस्ता खाेदून पाईप टाकण्यात येत आहे. पाईप टाकून झाल्यानंतर त्यामध्ये खड्डा खाेदताना निघालेली माती टाकून संबंधित कर्मचारी माेकळे हाेत आहे. यामुळे खाेदून ठेवण्यात आलेल्या जागी माेठमाेठे खड्डे पडल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे. काही नागरिक स्वत: मुरुम टाकून खड्डे बुजविताना दिसून येत आहेत. वाशिम शहरातील अनेक नवीन रस्तेसुद्धा नळजाेडणीसाठी फाेडण्यात येत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीत समोर आले.
वाशिम शहरातील अल्लाडा प्लाॅट, नवीन वसाहती, जुने शहर भागात अनेक ठिकाणी नगर परिषदेने नळजाेडणीसाठी खड्डे (नाल्या) खाेदून ठेवले ते व्यवस्थित न बुजविण्यात आल्याने नागरिकांमध्ये राेष व्यक्त केल्या जात आहे.
..............
अल्लाडा प्लाॅटमध्ये जीवघेणा खड्डा
वाशिम शहरातील अल्लाडा प्लाॅट परिसरात अनेक नागरिकांनी नवीन नळजाेडणी घेतली. ही जाेडणी घेत असताना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या नाल्या थातूरमातूर बुजविण्यात आल्याने दुचाकीचालकांचे अपघात हाेत असून, वाहनांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. खड्ड्यांची खाेली माेठी असल्याने चारचाकी वाहनाचे संपूर्ण चाक खड्ड्यात जात आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांचे नुकसान हाेत आहे.