शहराच्या सुरक्षेचा भार केवळ तीन ‘बिट मार्शल’वर

By admin | Published: June 20, 2015 02:56 AM2015-06-20T02:56:40+5:302015-06-20T02:56:40+5:30

चोरट्यांची दादागिरी वाढली; पोलीस यंत्रणा हतबल.

The city's security burden is only on the three 'bit marshals' | शहराच्या सुरक्षेचा भार केवळ तीन ‘बिट मार्शल’वर

शहराच्या सुरक्षेचा भार केवळ तीन ‘बिट मार्शल’वर

Next

धनंजय कपाले /वाशिम : शहर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या ३८ मोहल्ल्यातील सुरक्षेची जबाबदारी केवळ तीन ह्यबिट मार्शलह्ण सांभाळत आहेत. नेमका या संधीचा फायदा उचलून चोरटे आपले काम फत्ते करीत असल्याच्या मोठमोठय़ा दोन घटना १५ दिवसांच्या कालावधीत घडल्या. वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दीड वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटना व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात बिट मार्शल दिवस पाळीत व सात बिट मार्शल रात्र पाळीमध्ये गस्तीवर असायचे. परिणामी, शहरातील गुन्हेगारीवर बर्‍याच अंशी आळा बसला होता. हिरेमठ यांची बदली झाल्यानंतर हळूहळू ह्यबिट मार्शलह्णची संख्या कमी करून ती आजमितीला केवळ तीनवर आणण्यात आली आहे.

Web Title: The city's security burden is only on the three 'bit marshals'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.