दापुरा येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:29 AM2017-09-29T01:29:15+5:302017-09-29T01:29:41+5:30

मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्‍या दापुरा येथे पेरणी  यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी  झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ स प्टेंबर रोजी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.

Clashes in two groups at Dapura | दापुरा येथे दोन गटांत हाणामारी

दापुरा येथे दोन गटांत हाणामारी

Next
ठळक मुद्दे यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्‍या दापुरा येथे पेरणी  यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी  झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ स प्टेंबर रोजी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
फिर्यादी तारासिंग भासू चव्हाण रा. दापुरा यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार, पेरणी यंत्राच्या भाड्याच्या पैशाच्या वादावरून  आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी   व त्याच्या मामेभावास कुर्‍हाडीने व दगडाने मारहाण करून  जखमी केले. यातील आरोपी सदाशिव छगुन बोरकर याने दगड  मारून फिर्यादीच्या मामेभावास जखमी केले. याप्रकरणी आरोपी  खुशाल बंडू बोरकर, पुरुषोत्तम बंडू बोरकर, भगवान  रामचंद्र  बोरकर, भीमराव महादेव गटुले, सदाशिव छगुन बोरकर व  प्रवीण सदाशिव बोरकर सर्व रा.दापुरा यांच्याविरुद्ध कलम १४३,  १४५, १४७, ३२५, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल  केला, तर फिर्यादी खुशाल बंडू बोरकर यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार पेरणीच्या पैशांच्या वादावरून झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींनी संगनमत करून मारहाण केल्याची तक्रार  दिली. याप्रकरणी  पोलिसांनी आरोपी तरासिंग चव्हाण, प्रवीण  तारासिंग चव्हाण, अरविंद तारासिंग चव्हाण, रामनाथ पवार,  माणिक राठोड, राजेश राठोड, इंदल राठोड यांच्याविरुद्ध कलम  १४३, १४५,  १४७, ३२४,  भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्या त आला. 

Web Title: Clashes in two groups at Dapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.