मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 07:50 PM2017-12-07T19:50:39+5:302017-12-07T19:56:01+5:30
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील मुंगळा येथे ६ डिसेंबर रोजी ८ वाजताच्या दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील १२ जणांविरूद्ध मालेगाव पोलिसांनी विविध कलमान्वये ६ डिसेंबरला रात्रीदरम्यान गुन्हे दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंगळा येथील गुलाब दौलत नरोटे (४०) यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, किरकोळ कारणाहून घरामध्ये घुसून लोखंडी साहित्याने विरोधी गटातील सात जणांनी मारहाण केली. या तक्रारीहून सत्यनारायण सखाराम राऊत, संतोष भांदुर्गे, विनोद राऊत, सुभाष राऊत, पांडू राऊत, सुमनबाई राऊत, वैशाली राऊत, अशोक राऊत यांच्याविरूद्ध भादंवी कलम ४१८, ३०७, ३२४, ३२३, २९४, ४५२, ५०४, ५२७, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दुस-या गटातील मुंगळा येथील सत्यनारायण सखाराम राऊत (२५) यांनी पोलिसात फिर्याद दिली की, ते गजानन महाराज चौकात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उभे असताना भारत नरोटे, चंदू नरोटे, गुलाब नरोटे, व्यंकटेश नरोटे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरूद्ध भादंवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.