दोन गटात तुंबळ हाणामारी; २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 03:29 PM2019-03-20T15:29:05+5:302019-03-20T15:29:12+5:30

मानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Clashesh between Two groups; 20 cases filed against accused! | दोन गटात तुंबळ हाणामारी; २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

दोन गटात तुंबळ हाणामारी; २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकाश राहुल इंगोले या युवकाने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की मी मोटारसायकलने इंझोरीकडे जात असताना दुर्गादेवीच्या मंदिराजवळ आरोपी दिनेश रमेश राठोड याने वाद घालत तीक्ष्ण वस्तूने नाकावर मारून जखमी केले. यावेळी इतर आरोपींनी हातात काठ्या घेवून शिविगाळ केली व मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी दिनेश रमेश राठोड, अवि उल्हास राठोड, धनराज हिम्मत पवार, सागर किरण राठोड, राहूल दयाराम राठोड, पवन बाळू राठोड, धनराज पवार, उमेश भिका चव्हाण( सर्व रा. मोहगव्हाण) यांच्याविरूद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला; तर फिर्यादी दिनेश रमेश राठोड याच्या तक्रारीवरून आरोपी आकाश राहूल इंगोले, शुभम घनश्याम इंगोले, ऋषीकेश घनश्याम इंगोले, गौरव घनश्याम इंगोले, सागर विष्णू इंगोले, अमोल अरूण इंगोले, प्रमोद पंजाबराव इंगोले, रवि प्रभाकर इंगोले, मुकींदा पवार, मंगेश अरूण अगलदरे, पवन प्रल्हाद इंगोले, आदिंविरूद्ध कलम ३२३, १४३, १४७, ५०४, ५०६, भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Clashesh between Two groups; 20 cases filed against accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.