एसटीच्या अनुकंपाधारकास अहर्तेनुसार वर्ग ३ ची नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 03:01 PM2018-11-25T15:01:08+5:302018-11-25T15:01:12+5:30
वाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे. महामंडळाने गत आठवड्यात या संदर्भातील परिपत्रकानुसार विभाग नियंत्रक स्तरापर्यंत कार्यवाहीच्या पार पाडण्याच्या सुचनाही केल्या आहेत. तथापि, ही नियुक्ती देताना एसटी महामंडळाच्या २५ मे २०१६ च्या परिपत्रकाचा आधार घेण्याच्या सुचनाही केल्या आहेत.
एसटी महामंडळाने अनुकंपा तत्वावर एसटी कर्मचाºयांच्या कुटूंबातील एका अवलंबितास वर्ग-३ (राज्यसंवर्ग) मधील कनिष्ठ वाहतूक नियंत्रक, कनिष्ठ सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, कनिष्ठ भांडारपाल, कनिष्ठ स्थापत्य अभियंता संवर्गात विहित केलेली शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक पात्रतेच्या अधीन, तसेच बिंदू नामावली व इतर तरतुदीचे पालन करून नियुक्ती देण्याच्या सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यातच १० आॅक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार एसटी महामंडळाने सर्व कर्मचाºयांना २५ एप्रिल २०१८ पासून नियमित वेतनश्रेणी लागू करून कनिष्ठ वेतनश्रेणी लागू केली आहे. तथापि, २१ मे २०१८ नुसार वर्ग ३ मधील ९ प्रवर्गाची वेतनश्रेणी उन्नत करून वेतन श्रेणी उन्नत करून त्यांना त्यांना वर्ग-२ कनिष्ठ अधिकारी पदाचा देण्यात आला असून, यात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक व कनिष्ठ स्थापत्य अभियंता या दोन संवर्गाचा समावेश असल्याने हे दोन संवर्ग सोडून वाहतूक निरीक्षक, लेखाकार, भांडारपाल या ३ प्रवर्गात अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी २५ मे २०१६ च्या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारास शारीरिक व शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्याबाबत पूर्वीही परिपत्रक प्राप्त झाले असून, त्याची कार्यवाहीही सुरू आहे. नव्या परिपत्रकातील सुचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-चेतना खिरवाडकर
विभाग नियंत्रक, अकोला.