इयत्ता आठवीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By admin | Published: July 1, 2014 10:13 PM2014-07-01T22:13:05+5:302014-07-02T00:34:41+5:30
वाशिम जिल्ह्यातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी पुस्तकापासून अद्यापही वंचित आहेत.
वाशिम : जिल्ह्यातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी पुस्तकापासून अद्यापही वंचित आहेत. भारत सरकारने लागू केलेल्या शिक्षणचाहक्क कायदयानुसार वर्ग ४ वे ५ वा व जेथे ७ वा वर्ग तेथे ८ वा वर्ग असा नवीन पॅटर्न तयर केलेला आहे त्यानुसार ज्या वर्ग १ ते ४ शाळेच्या १ किमी परिसरात ५ वा वर्ग नाही तेथे ५ वा वर्ग आणि ज्या वर्ग १ ते ७शाळेच्या ३ किमी परिसरात ८ वा वर्ग नाही तेथे ८ वा वर्ग सुरु करावयाचा आहे. त्यानुसार वाशिम जि.प. च्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालक पुणे यांचेकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार शिक्षण संचालकानी वर्ग ५ वा सुरु करण्याची परवानगी जून महिन्यामध्येच दिली होती त्यानुसार नविन वर्ग ५ वा करिता पुस्तके उपलब्ध होउन त्याचे वाटप सुद्धा झाले आहे परतु वर्ग ८ वीला २६ जून पर्यंत परवानगी दिली नव्हती त्यामुळे नविन सुरु झालेल्या वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करने शक्य झाले नाही . याबाबत शिक्षण उपसंचालकांसोबत बोलणे झाले असून लवकरच वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली जाणार असल्याचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी कळविले आहे.