स्वच्छता मिशन कक्षाने राबविला स्वच्छ दिवाळी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 07:28 PM2017-10-24T19:28:32+5:302017-10-24T19:29:47+5:30
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन क क्षाने दिवाळीच्या औचित्यावर १८ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. याच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाने तालुकास्तरीय चमूंना सोबत घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या सुचनांनुसार ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार दिवाळी सणाचे औचित्य साधून कारंजा वगळता उर्वरीत पाचही तालुक्यातील एकुण २५ गावांत या सप्ताहांतर्गत कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात आले. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी जाऊन लोक कलावंतांनी दिवाळीनिमित्त शौचालय बांधायची आर्त साद घातली. भाऊबीजेला बहिणीला शौचालयाची भेट देण्याचे आवाहनही आपल्या गीतांच्या माध्यमातून कलावंतांनी केले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील नऊ कलावंतांनी योगदान दिले. यामध्ये विलास भालेराव, केशव डाखोरे, सुशिला घुगे, प्रज्ञानंद भगत, बेबीनंदा कांबळे, कविनंद गायकवाड, धम्मपाल पडघान, विद्या भगत, दौलत पडघान यांचा समावेश होता.