श्रमदानातून गाव तलावाची साफसफाई; रासेयो पथकाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:48 PM2018-02-02T13:48:02+5:302018-02-02T13:49:10+5:30
वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दत्तक ग्राम टो येथे पार पडले.
वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दत्तक ग्राम टो येथे पार पडले. सदर शिबिरातून मंगळवार ते गुरुवार या दरम्यान शिबिरार्थ्यांनी श्रमदानाच्या सत्रात टो येथील गाव तलावाची साफसफाई केली.
शिबिरार्थ्यांनी श्रमदानाच्या सत्रातून ग्राम स्वच्छतेसोबत गावातील समशानभूमीचा परिसराची स्वच्छता केली तसेच दुष्काळी तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाव तलावात मोठ्या प्रमाणात गवत तथा बेशरमाची झाडे वाढली होती. हा सर्व परिसर शिबिरार्थ्यांनी स्वच्छ केला. या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भविष्यात ग्रामवासीयांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास शिबिराथींनी व्यक्त केला. शिबिरार्थ्यांनी राबविलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे संस्थाध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे तथा कार्यकारी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे यांनी कौतुक केले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. दीपक दामोदर, डॉ. बी. आर. तनपुरे, डॉ. एस.व्ही. रूक्के यांच्या मार्गदर्शनात रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.