वाशिम जिल्ह्यात स्वच्छता दिनाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:04 PM2018-10-02T14:04:26+5:302018-10-02T14:05:12+5:30
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले.
विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली : स्वच्छता राखण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छता दिनानिमित्त वाशिम रेल्वे स्थानकावर भारतीय स्काऊट-गाईड आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला.
अस्वच्छता ही विविध आजारांना निमंत्रण देणारी बाब असून, अस्वच्छतेला हद्दपार करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी २ आॅक्टोबर हा स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासन, स्वच्छता मिशन कक्ष तसेच विद्यार्थ्यांच्यावतीने स्वच्छता विषयक कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छता राखून सामाजिक आरोग्याचा संदेश देण्यात आला. दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचालयाचा नियमित वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छतेबाबत घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव यांच्यासह जि.प. सदस्य, पं.स. पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य, विभागप्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थदेखील स्वच्छताविषयक कार्यक्रमांत सहभागी होते.