"नमामी गंगे" अभियानांतर्गत काटेपूर्णा नदीची स्वच्छता!

By admin | Published: May 19, 2017 07:47 PM2017-05-19T19:47:27+5:302017-05-19T19:47:27+5:30

हिंदवी परिवार व छत्रपती तरुण मित्रमंडळाचा सहभाग

Cleanliness of Kateparona river under the "Namami Gange" campaign! | "नमामी गंगे" अभियानांतर्गत काटेपूर्णा नदीची स्वच्छता!

"नमामी गंगे" अभियानांतर्गत काटेपूर्णा नदीची स्वच्छता!

Next

ऑनलाइन लोकमत
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वातील ह्यनमामी गंगेह्ण या अभियानांतर्गत काटेपूर्णा नदी पात्र स्वच्छता अभियान राबविले जात असून त्यात वाशिम येथील हिंदवी परिवार व छत्रपती बहुउद्देशिय तरूण मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 
या अभियानास १५ मे पासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी काटेपूर्णा नदी पात्रातील संपूर्ण केरकचरा, प्लास्टिक गोळा करून जाळण्यात आला. या मोहिमेत जय बजरंग मंडळ, शिवशक्ती मंडळ, भिमशक्ती मंडळ यांचेही सहकार्य लाभले. संगीत, कथाकथन व लोककलेच्या माध्यमातून लोकशाहीर बापूराव वानखडे व संगीतकार सदाशिवराव इंगोले यांनी नदी स्वच्छतेसंबंधी जागर केला, अशी माहिती तरूण मित्रमंडळाचे दिलीप मेसरे यांनी दिली.

Web Title: Cleanliness of Kateparona river under the "Namami Gange" campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.